गौहाती
गौहाती : आसाम राज्यातील सर्वांत मोठे शहर व कामरूप जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या उपनगरांसह २,००,३७७ (१९७१). हे ब्रह्मपुत्रेच्या दोन्ही तीरांवर वसले असले, तरी शहराचा मुख्य भाग नदीच्या डाव्या तीरावर आहे. हे कलकत्त्याच्या ईशान्येस सु. ५३९ किमी. व शिलाँगच्या उत्तरेस सु. ६७·५ किमी. आहे.